लोकलमधून ८ प्रवासी पडले, १ ठार

मध्य रेल्वेच्या सायन कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान संध्याकाळी लोकलमधून 8 प्रवासी पडून झालेल्या अपघातात 1 जण ठार तर सात जण जखमी झाले आहेत.

जयवंत पाटील | Updated: Mar 26, 2013, 12:02 AM IST

www.24taas.com, मुंबई
मध्य रेल्वेच्या सायन कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान संध्याकाळी लोकलमधून 8 प्रवासी पडून झालेल्या अपघातात 1 जण ठार तर सात जण जखमी झाले आहेत.
दादर-ठाणे या स्लो लोकलमध्ये हा प्रकार घडला. संध्याकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी ही घटना घडली. दुस-या ट्रॅकवरुन सीएसटीकडे जाणा-या लोकलमधून पावडरसदृष पदार्थ फेकल्याने ही दुर्घटना घडल्याचं समजतंय. दोन जखमी प्रवाशांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

इतर सहा जखमींना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सायन रुग्णालयात भर्ती करण्यात आलेल्या प्रवाशांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.