महाडच्या दुर्घटनेनंतर मुंबईतले ५ जण बेपत्ता

महाडच्या सावित्री नदीच्या दुर्घटनेनंतर नालासोपाऱ्यातले ५ जण बेपत्ता असल्याची माहिती पुढे येत आहे. नालासोपारा पश्चिम येथे राहणारे समीर बलेकर, त्यांच्या दोन बहिणी आणि त्यांचे पती असे ५ जण बेपत्ता आहेत. 

Updated: Aug 4, 2016, 08:14 PM IST
महाडच्या दुर्घटनेनंतर मुंबईतले ५ जण बेपत्ता title=

मुंबई : महाडच्या सावित्री नदीच्या दुर्घटनेनंतर नालासोपाऱ्यातले ५ जण बेपत्ता असल्याची माहिती पुढे येत आहे. नालासोपारा पश्चिम येथे राहणारे समीर बलेकर, त्यांच्या दोन बहिणी आणि त्यांचे पती असे ५ जण बेपत्ता आहेत. 

स्नेहल बैयकर, सुनील बैयकर, दिपाली पाटकर, भूषण पाटकर आणि अनिश पाटकर अशी बेपत्ता असलेल्या सदस्यांची नावं आहेत. दीपाली आणि स्नेहल यांचे वडील पंधरा दिवसांपूर्वी वारले होते. त्यामुळे दिवसकार्याससाठी हे कुटुंब रत्नागिरीला गेलं होतं. मंगळवारी कार्य आटपून मुंबईला येण्यासाठी या सगळ्यांनी जयगड मुंबई बस पकडल्याची माहिती आहे. मात्र ही बस बेपत्ता झाली असून तिचा शोध अजून सुरु आहे.