तंबाखूचे ७० टक्के पोलिसांना व्यसन

पोलिसांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण ७० टक्के आहे, तसेच ३५ टक्के पोलिसांमध्ये कर्करोगाच्या शक्यतेची लक्षणे दिसून आल्याचं धक्कादायक सर्वेक्षण आहे.

Updated: May 21, 2015, 04:41 PM IST
तंबाखूचे ७० टक्के पोलिसांना व्यसन title=

मुंबई : पोलिसांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण ७० टक्के आहे, तसेच ३५ टक्के पोलिसांमध्ये कर्करोगाच्या शक्यतेची लक्षणे दिसून आल्याचं धक्कादायक सर्वेक्षण आहे.

कामाचा ताण, दीर्घ रात्रपाळी अशा सबबी पुढे करून पोलीस तंबाखू सेवन करत असल्याचे दिसून आले. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनने केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. 

अनेक वर्षे तंबाखू खाल्ल्याने कर्करोग होण्याचा धोका असल्याचे माहीत असूनही अनेक जण सवय न मोडता सबबी पुढे करणे पसंत करतात. तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाचा, घशाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाचा, घशाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

सीपीएएने नायगाव, दिंडोशी, वरळी, मरिन ड्राइव्ह, ताडदेव, मलबार हिल, बीकेसी आणि दादर पोलीस ठाण्यातील ३ हजार पोलिसांची आरोग्य तपासणी केली होती. या वेळी त्यांनी पोलिसांशी संवाद साधला. यातूनच ही निरीक्षणे तयार करण्यात आली आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.