यादव, भूषण यांची उचलबांगडी केजरीवालांमुळेच - मयांक गांधी

प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची उचलबांगडी करत अंतर्गत संघर्षावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आपकडून केला जात असतानाच आता मयांक गांधी यांनी ब्लॉगद्वारे आपमधील संघर्ष चव्हाट्यावर आणलाय. 

ANI | Updated: Mar 5, 2015, 05:14 PM IST
यादव, भूषण यांची उचलबांगडी केजरीवालांमुळेच - मयांक गांधी title=

मुंबई: प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची उचलबांगडी करत अंतर्गत संघर्षावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आपकडून केला जात असतानाच आता मयांक गांधी यांनी ब्लॉगद्वारे आपमधील संघर्ष चव्हाट्यावर आणलाय. 

योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण राजकीय व्यवहार समितीमध्ये (पीएसी) असतील तर मी संयोजकपदाचा राजीनामा देईल, अशी धमकी अरविंद केजरीवाल यांनी दिली होती असा दावा आपचे नेते मयांक गांधी यांनी केला आहे.

आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बुधवारी बैठक झाली होती. या बैठकीत योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पीएसीतून उचलबांगडी करण्यात आली होती. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील आपनं उघड केला नव्हता. मात्र आपचे नेते मयांक गांधी यांनी ब्लॉगद्वारे या बैठकीचा तपशील जाहीर केला. २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण पीएसीमध्ये असतील तर पक्षाच्या संयोजकपदाचा राजीनामा देईन अशी धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर कालच्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी स्वतःहूनच पीएसीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असं मयांक गांधी यांनी म्हटलं आहे.

बैठकीतील चर्चेची वाच्यता बाहेर होऊ नये यासाठी केजरीवाल यांनी मला तोंड बंद ठेवायला सांगितलं, असा आरोपही त्यांनी केला आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.