आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला तर राष्ट्रवादीला 'भ्रष्टवादी' टोमणा

शैक्षणिक टॅबला खेळणं म्हणणाऱ्या मनसेला राजकारणच खेळणं वाटतं, असा टोला युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी लगावला. तर राष्ट्रवादीच भ्रष्टवादी असल्याचा टोमणा त्यांनी यावेळी मारला.

Updated: Aug 6, 2015, 06:52 PM IST
आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला तर राष्ट्रवादीला 'भ्रष्टवादी' टोमणा title=

मुंबई : शैक्षणिक टॅबला खेळणं म्हणणाऱ्या मनसेला राजकारणच खेळणं वाटतं, असा टोला युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी लगावला. तर राष्ट्रवादीच भ्रष्टवादी असल्याचा टोमणा त्यांनी यावेळी मारला.

विद्यार्थ्यांच्या टॅबवरून विविध आरोप करणाऱ्या विरोधकांना आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. विद्यार्थ्यांच्या टॅबला खेळणं म्हणणाऱ्या मनसेला राजकारणही खेळणंच वाटतंय तर टॅब खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारी राष्ट्रवादीच भ्रष्टवादी आहे. त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा भडीमार त्यांनी केला.

महापालिका शाळेत व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी त्यांना टॅब देण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात साकारणार आहे, असे ते म्हणालेत.

महापालिका शाळेतील इयत्ता आठवीत शिकणार्‍या २२ हजार विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा ३२ कोटींचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासूनच विद्यार्थ्यांना टॅब मिळणार असून विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्याला कायमची फुली बसणार आहे. शिवसेनेने वचननाम्यात दिलेल्या वचनाची पूर्तता होत असताना शिक्षण क्षेत्रातही डिजिटल क्रांती होत आहे, असे ते म्हणालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.