मुंबईत विमानाच्या पायलटला दिसलं संशयित ड्रोन

सर्जिकल स्टाईकनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण आहे. तर दहशतवादी देखील सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी भारतात दहशतवादी हल्ला करु शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच अनेक ठिकाणी ड्रोनवर बंदी आहे. मुंबईतही ड्रोनवर बंदी आहे. पण इंडिगो विमानाच्या पायलटने कुर्ला येथे एक संशयित ड्रोन पाहिल्याने खळबळ माजली आहे.

Updated: Oct 18, 2016, 09:29 PM IST
मुंबईत विमानाच्या पायलटला दिसलं संशयित ड्रोन title=

मुंबई : सर्जिकल स्टाईकनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण आहे. तर दहशतवादी देखील सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी भारतात दहशतवादी हल्ला करु शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच अनेक ठिकाणी ड्रोनवर बंदी आहे. मुंबईतही ड्रोनवर बंदी आहे. पण इंडिगो विमानाच्या पायलटने कुर्ला येथे एक संशयित ड्रोन पाहिल्याने खळबळ माजली आहे.
 
विमान दिल्लीहून मुंबईला आलं आणि पायलटने एटीसीला माहिती दिली की, त्याने कुर्ला येथे सफेद पूलजवळ एक ड्रोन पाहिला. लगेचच याची माहिती पुढे सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली असून त्याबाबतची कारवाई सुरु झाली आहे.

पोलिसांकडून तपास सुरु झाला आहे. मुंबईत कोठेही संशयित ड्रोन दिसताच त्याला उडवण्याचे आदेश याआधीच देण्यात आले आहे. देशभरातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये ड्रोनर बंदी आहे. त्यामुळे संशयित ड्रोन दिसल्याने खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. मुंबई ही दहशवाद्यांच्या निशान्यावर असल्याचं देखील समोर आलं आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून मुंबईवर हल्ल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईतील सर्वत महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.