अजित पवार अपघातातून बचावले

By Jaywant Patil | Last Updated: Monday, August 27, 2012 - 16:35

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीला आज मुंबईजवळील वाशी खाडी पुलाजवळ ट्रकने धडक दिली. दुपारी एकच्या सुमारास डिव्हायडर ओलांडून एक ट्रक अचानक अजित पवार यांच्या ताफ्यात घउसला. अजित पवार हे पुण्याहून मुंबईकडे जात असताना दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
या अपघातातून अजित पवार सहीसलामत बचावले असून ते सुखरुप आहेत. त्यांना आणि इतर कुणालाही गंभीर इजा झालेली नाही. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. तसंच या अपघातामागे काही घातपात तर नाही ना,याचीही पोलीस चौकशी करत आहेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकींसाठी अजित पवार यांचा पुणे-मुंबई दौरा वारंवार सुरू असतो. मात्र आजचा प्रवास त्यांच्यासाठी जीवघेणा ठरू शकला असता. आजच्या अपघातातून अजित पवार बचावले आहेत.

First Published: Monday, August 27, 2012 - 16:35
comments powered by Disqus