आर्ची आणि परशाचा मुंबईत पुनर्जन्म

सैराट सिनेमाने तरूणांना खरोखर वेड लावलं आहे, मुंबईत खूप लांब अंतरावर आर्ची आणि परशासारखे...

Updated: May 19, 2016, 03:00 PM IST
आर्ची आणि परशाचा मुंबईत पुनर्जन्म title=

मुंबई : सैराट सिनेमाने तरूणांना खरोखर वेड लावलं आहे, मुंबईत खूप लांब अंतरावर आर्ची आणि परशासारखे कपडे घातलेले तरूण-तरूणी रस्त्यावर चालले असताना, (व्हिडीओ पाहा, बातमीच्या सर्वात खाली) त्यांचा फ्लाय ओव्हरवरून पाठलाग करण्याचा आणि त्यांना आर्ची - परशा म्हणून हाक देण्याचा प्रयत्न काही तरूणांनी केला.

तरूणांना खरोखर 'याड लागलं'

आर्ची परशाचा  पुनर्जन्म असं काहीही नाहीय, पण तरूणांना या सिनेमाने केवढं वेड लावलंय, की रस्त्यावर जाणाऱ्या तरूण-तरूणींमध्येही त्यांना आर्ची परशा दिसायला लागले आहेत.

हा व्हिडीओ त्यांनी यू-ट्यूबवर टाकून आर्ची आणि परशाचा पुनर्जन्म असं टायटल त्यांनी दिलंय...

व्हिडीओ पाहा, नेमकं कसं तरूणांनी किती वेड लागलंय...