बाळासाहेबांचा संपत्तीचा वाद, संजय राऊतांची झाली साक्ष

 बाळासाहेब संपत्ती वादा प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सामना वृत्तपत्राचे संपादक खासदार संजय राऊत यांची आज साक्ष झाली. यावेळी स्वत: संजय राऊत यांनी उपस्थित राहून साक्ष दिली. 

Updated: Dec 5, 2016, 07:18 PM IST
बाळासाहेबांचा संपत्तीचा वाद, संजय राऊतांची झाली साक्ष  title=

मुंबई :  बाळासाहेब संपत्ती वादा प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सामना वृत्तपत्राचे संपादक खासदार संजय राऊत यांची आज साक्ष झाली. यावेळी स्वत: संजय राऊत यांनी उपस्थित राहून साक्ष दिली. 

सामना वृत्त पत्रात गेली ४०-४५ वर्षे काम करत असून मला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे पण काही महत्त्वाच्या वृत्तासांठी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांना विचारावे लागायचे. तसेच जयदेव ठाकरे सामना मध्ये कॉलम लिहायचे असेही यावेळी साक्ष देताना संजय राऊत यांनी सांगितले. 

बाळासाहेब संपत्ती वाद प्रकरणात संजय राऊत हे साक्षीदार आहेत त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने साक्षीकरता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण, संजय राऊत साक्षीकरता मुंबई उच्च न्यायालयात हजर न राहिल्याने न्यायालयाने संताप व्यक्त करत संजय राऊत आजच्या सुनावणी हजर राहण्याचे आदेश दिले होते. यावेळी जर संजय राऊत साक्षीकरता हजर राहिले नाही तर त्यांना कोर्टात आणले जाईल त्यांना कोर्टात उभे केले जाईल याची काळजी कोर्ट घेईल अशा शब्दात न्यायालयाने संजय राऊत यांना खडसावले होते. 

आता संजय राऊत यांची साक्ष पूर्ण झाली असून नवीन साक्षीदारांची साक्ष १४ जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे.  

आज संजय राऊत यांची झालेली साक्ष पुढील प्रमाणे ...

किती वर्षांपासून का
कोर्ट: आपण सामनासाठी किती वर्ष काम करता आहात?
राऊत: २५ वर्षं

प्रश्न: तुम्ही वैयक्तिक रित्या शिवसेनेशी जोडले गेलेले आहात का?
राऊत: हो

प्रश्न: कसे
राऊत: सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे

प्रश्न (जयदेवच्या वकील) : तुम्ही शिवसेनेत किती वर्षांपूर्वी रुजू झालात?
राऊत: ४५

प्रश्न: तुम्ही सामनात काय म्हणून जॉईन केलंत?
राऊत: कार्यकारी संपादक

प्रश्न: तुम्हाला काम करताना कोणाकडून सल्ला घ्यावा लागतो का?
राऊत: मला बऱ्यापैकी स्वातंत्र्य आहे पण काही महत्त्वाचे असेल तर पूर्वी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होते

प्रश्न: तुम्हाला हा फोटो कसा मिळाला?
कोर्ट: यांनी आमचा हा फोटो आहे आहे हे सांगितल्यावर ते पुरेसे आहे

प्रश्न: 23 सप्टेंबर २००७ ला आणि ३१ ऑगस्ट २००८ ला सामनात हे दोन लेख छापण्यात आलेले होते का?
राऊत: हो

प्रश्न :  छापण्यात आलेले लेख जयदेव ठाकरेंनी दिलेले तसेच छापले होते का?
राऊत: हो

प्रश्न: मानो या मानो या शीर्षकाखाली छापण्यात आलेले लेख किती वेळा छापण्यात आले?
राऊत: हा रविवारच्या पेपरमध्ये येणारा स्तंभ होता तो जवळपास दीड वर्ष चालला