बँक कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ

आता बँक कर्मचाऱ्यांसाठी एक खूष खबर आहे. गेले अनेक महिने सुरु असलेल्या वाटाघाटीनंतर आता अखेर इंडियन बँक असोसिएशन अर्थात आयबीए आणि यूनायटेड फोरम ऑफ बँक्स यांच्यात सोमवारी नव्या करारावर सह्या होणार आहेत. 

Updated: May 23, 2015, 06:55 PM IST
बँक कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ title=

मुंबई : आता बँक कर्मचाऱ्यांसाठी एक खूष खबर आहे. गेले अनेक महिने सुरु असलेल्या वाटाघाटीनंतर आता अखेर इंडियन बँक असोसिएशन अर्थात आयबीए आणि यूनायटेड फोरम ऑफ बँक्स यांच्यात सोमवारी नव्या करारावर सह्या होणार आहेत. 

या करारानुसार सरकारी, जुन्या खासगी बँक आणि काही मोठ्या परदेशी बँकांमधील कर्मचा-यांना १५ टक्के पगारवाढ होणार आहे. या पगारवाढीमुळे ४, ७२५ कोटी रुपयाचं अधिक भार सिस्टमवर पडणार असला तरी विविध बँकातील कर्मचाऱ्यांना या पगारवाढीमुळे मोठा दिलासा मिळणार हे नक्की. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.