महापालिकेच्या निकालावर फडणवीस सरकारचं भवितव्य...

 एका महत्त्वाच्या बातमीनं बातमीपत्राची सुरूवात करूयात....मुंबई महापालिकेच्या निकालांवरच फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असल्याचं चित्र राज्यात निर्माण झालंय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 9, 2017, 06:10 PM IST
 महापालिकेच्या निकालावर फडणवीस सरकारचं भवितव्य... title=

मुंबई :  एका महत्त्वाच्या बातमीनं बातमीपत्राची सुरूवात करूयात....मुंबई महापालिकेच्या निकालांवरच फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असल्याचं चित्र राज्यात निर्माण झालंय. 

 राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असून शिवसेना सरकारच्या बाहेर पडण्याची केवळ औपचारिकता बाकी असल्याचं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय. 

पक्षीय बलाबल पाहा 

 
 शिवसेनेला भाजप हाकलून देणार की शिवसेना स्वाभिमानानं बाहेर पडणार एवढाच प्रश्न असल्याचं त्यांनी नमूद केलं. तर शिवसेना सरकारच्या बाहेर पडल्यास तब्बल दीडशेपेक्षा जास्त आमदार फडणवीस सरकारच्या विरोधात जाणार असल्याचं सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याला पुष्टी दिलीय. 
 
 तर  शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी भाजप सरकार पाच वर्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलाय.   अनेक मोठे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट दानवेंनी केलाय.