आशाताईंना भारतरत्न देण्याची भाजप नेत्याची मागणी

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनाही भारतरत्न दिलं जावं, अशी मागणी  मुंबई भाजपाचे प्रमुख आणि आमदार आशिष शेलार यांनी केलीय. 

Updated: Dec 25, 2014, 11:19 AM IST
आशाताईंना भारतरत्न देण्याची भाजप नेत्याची मागणी title=

मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनाही भारतरत्न दिलं जावं, अशी मागणी  मुंबई भाजपाचे प्रमुख आणि आमदार आशिष शेलार यांनी केलीय. 

नुकताच, दिवंगत गायक मोहम्मद रफी यांच्या जयंती निमित्तानं 'स्पंदन आर्टस्' या संस्थेनं एक कार्यक्रमा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आशा भोसले यादेखील उपस्थित होत्या. 

यावेळी बोलताना, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि मदन मोहन मालवीय यांचा 'भारतरत्न' पुरस्कारानं सन्मान करण्यात आल्याचं स्वागत करत शेलार यांनी पुढच्या वर्षात आशा भोसले यांना हा सन्मान दिला जावा, अशी मागणी केलीय. 
 
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर हेदेखील उपस्थित होते. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.