कोणत्या गाडीला उद्या मिळणार सूट, पाहा यादी

 सुप्रीम कोर्टाने BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला बंदी घातल्याने, धाबे दणाणलेल्या वाहन कंपन्यांनी गाड्यांवर भरघोस सूट दिली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 31, 2017, 12:15 AM IST
कोणत्या गाडीला उद्या मिळणार सूट, पाहा यादी  title=

मुंबई :  सुप्रीम कोर्टाने BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला बंदी घातल्याने वाहन कंपन्यांच्या पायाखालची जमीन घसरली आहे, त्यामुळे त्यांनी आता आपल्या या इंजिनच्या गाड्यांवर भरघोस सूट दिली आहे.

होंडाने स्कूटरवर तब्बल १३ हजार ५०० रुपये इतकी भरघोस सूट दिली आहे.  तर मोटारसायकलवर तब्बल 18 हजार 500 रुपयांचा डिस्काऊंट दिला आहे.

आज आणि उद्यापर्यंतच गाड्या बूक करणाऱ्यांना ही सूट मिळणार आहे. या गाड्या खरेदी केल्यानंतर उद्यापर्यंतच नोंदणी करायची आहे. त्यानंतर या गाड्यांची नोंदणी होणार नाही.

गाड्यांना किती रुपयांची सूट मिळते पाहा यादी...

डीम युगा -  पूर्वीची किंमत ६२ हजार - आताची किंमत ४८ हजार - सूट १४ हजार

लियो - पूर्वीची किंमत ६४ हजार - आताची किंमत ५० हजार - सूट १४ हजार

नवी - पूर्वीची किंमत ५३ हजार - आताची किंमत ३४ हजार - सूट १९ हजार

अॅक्टीव्हा - पूर्वीची किंमत ५८ हजार - आताची किंमत ४७ हजार - सूट ११ हजार

सीबीआर - पूर्वीची किंमत १ लाख ९० हजार - आताची किंमत १ लाख ७० हजार - सूट २० हजार

सीबीआर १५० - पूर्वीची किंमत १ लाख ४० हजार - आताची किंमत १ लाख २० हजार - सूट २० हजार

तसेच ड्युएट, मायस्ट्रो एज, प्लेजरवर १२ हजार ५०० रुपये सूट 

एचएफ डिलक्स सिरीजवर ५ हजार सूट 

ग्लॅमर, एक्सप्रो, आय स्मार्ट १०० वर ७ हजार ५०० रुपयांची सूट 

स्प्लेंडर प्लसवर ५ हजारांची सूट