इरॉस थिएटर इमारत : ४ ऑफिसचे सील काढा - मुंबई उच्च न्यायालय

शहरातील प्रसिद्ध इरॉस थिएटर इमारतीला ठोकण्यात आलेल्या सीलपैकी त्या इमारतीतील ४ ऑफिसचे सील काढावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत हे सील काढावेत असे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिका-यांना दिलेत. 

Updated: Jan 19, 2017, 09:00 AM IST
इरॉस थिएटर इमारत : ४ ऑफिसचे सील काढा - मुंबई उच्च न्यायालय title=

मुंबई : शहरातील प्रसिद्ध इरॉस थिएटर इमारतीला ठोकण्यात आलेल्या सीलपैकी त्या इमारतीतील ४ ऑफिसचे सील काढावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत हे सील काढावेत असे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिका-यांना दिलेत. 

न्या. के. के. तातेड यांच्यासमोर याप्रकरणी तातडीची सुनावणी झाली. याप्रकरणी पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी होणार आहे. खंबाटा आणि कर्मचा-यांचा वाद सुरु आहे. मात्र गॅलेक्सी एविएशन नावाच्या एका आस्थापनाने इरॉसमधील चार ऑफिसेस भाडे तत्वावर घेतलेत. त्यामुळे त्यांचा या वादाशी संबंध नसल्याचे न्यायायलात सांगण्यात आलंय. त्यावर तुर्तास न्यायालयाने विनंती मान्य करत गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सील तोडावे, असे आदेश दिलेत.

चर्चगेट स्थानकाबाहेर खंबाटा एविएशनची इमारत आहे, जी इरॉस थिएटर इमारत नावाने प्रसिद्ध आहे. गेल्या फेब्रुवारी 2016 पासून खंबाटा एविएशनमधील कर्मचा-यांचे पाच कोटी रुपये पगार दिलेला नाही. याबाबत कामगार न्यायालयाने इरॉस इमारत विकून कामगारांचे पैसे द्यावे असे आदेश दिले होते त्यानुसार मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाने बुधवारी इरॉस इमारतीला सील ठोकले होते. यावेळी या इमारतीतील 24 कार्यालयांना देखील सील लावण्यात आले होते.