बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी छगन भुजबळांची साडेतीन तास चौकशी

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची आज साडेतीन तास चौकशी झाली, छगन भुजबळ यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली असल्याचं यापूर्वीचं म्हटलं जात होतं, साडेतीन तास चाललेल्या चौकशीत नेमकी काय चौकशी झाली हे अजून समोर आलेलं नाही.

Bollywood Life | Updated: Apr 30, 2015, 10:17 PM IST
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी छगन भुजबळांची साडेतीन तास चौकशी title=

मुंबई : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची आज साडेतीन तास चौकशी झाली, छगन भुजबळ यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली असल्याचं यापूर्वीचं म्हटलं जात होतं, साडेतीन तास चाललेल्या चौकशीत नेमकी काय चौकशी झाली हे अजून समोर आलेलं नाही.

 कोर्टाच्या आदेशाची वाट न पाहता गरज वाटल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.  तपास पूर्ण करून 18 जूनपर्यंत कोर्टात अहवाल सादर करावा, असे आदेशही कोर्टानं एसीबी आणि ईडीसह इतर तपास यंत्रणांना दिले आहेत. त्यामुळे तपास यंत्रणा आता छगन भुजबळांच्या विरोधात गुन्हा दाखल करतात का?, याकडे सर्वांच लक्ष लागलंय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.