'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना जाहीर

यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या नावाची घोषणा केली आहे. 

Updated: Apr 30, 2015, 08:51 PM IST
'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना जाहीर title=

मुंबई : यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या नावाची घोषणा केली आहे. 

बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड आहे. महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असून १० लाख रुपये रोख, मानपत्र, शाल-श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. राज्य शासनाच्यावतीने १९९७ पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाची शिफारस केली होती. महाराष्ट्र भूषण या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं अभिनंदन केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.