कर्जपुरवठा करणाऱ्या बँका उध्वस्त केल्या कोणी? - मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले

कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत सडेतोड उत्तर दिलं. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहणारच अशी ग्वाही आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. 

Updated: Jul 20, 2015, 09:34 PM IST
कर्जपुरवठा करणाऱ्या बँका उध्वस्त केल्या कोणी? - मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले title=

मुंबई: कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत सडेतोड उत्तर दिलं. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहणारच अशी ग्वाही आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. 

राज्यात ६० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेलीच नाही हे मुख्यमंत्र्यांनी आकेडवारीनिशी सभागृहाला दाखवून दिलं. कॅगनंही याबाबत ताशेरे ओढल्याचं मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या बँका उध्वस्त केल्या कोणी? असा सवाल विचारत मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारचे वाभाडे काढले.  

कर्जमाफी नेमकी कुणाला हवी? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी करत कर्जमाफी दिली जाणार नाही असं तडाखेबंद उत्तर दिलं. 

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे -

शेतकऱ्यांना मदत 

- दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत जाहीर

- प्रति हेक्टर १५०० रुपयांची मदत

- दोन हेक्टरपर्यंत मिळणार मदत 

- शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार पैसे

- मदतीसाठी ३६० कोटी रुपयांची तरतूद 

- अधिक वाढ करावी लागली तर केली जाईल

- चारा पिकासाठी २५ कोटी

- २ लाख हेक्टरवर चारा पिके घेण्याचे नियोजन

- चाऱ्याची कमतरात असेल तर चारा डेपो उघडण्याचे नियोजन केले आहे

- २७ जुलैपर्यंत पाऊस पडला नाही तर २२ लाख हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट

मी शेतकरीच... मुख्यमंत्री

- मला शेतीचे समजत नाही हा अजित पवारांचा आऱोप चुकीचा

- पाच पिढ्यांचा शेतकरी आहे मी

- मला आता वजनामुळे खाली बसता येत नाही पण मी गाई धुवून दाखवतो

- हे खरे आहे मला तुमच्या इतके शेतीतले समजत नाही

बँकांवर एफआयआर दाखल करणार

- शेतकऱ्यांना कर्ज देणार नाहीत अशा बँकांवर एफआयआर दाखल केला जाणारच

- सहकारी बँकांचे जाळे जास्त होते कृषिकर्ज देणारे

- या सहकारी बँका खाऊन टाकल्या

- एकीकडे सहकारी बँका कर्ज देऊ शकत नाही, त्यांची अवस्था नाही

- शेतकऱ्यांवर ही अवस्था आली त्यांना कर्ज मिळत नाही कारण बँका खाऊन टाकल्या

मागच्या कर्जमाफीचे काय झाले

- कर्जमाफीवर कॅगने काही आक्षेप घेतले

- पात्र व्यक्तींना कर्जमाफीचा लाभ न देणे

- अपात्र व्यक्तींना कर्जमाफीचा लाभ देणे

- थेट शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे आवश्यक असताना संस्थांना कर्जमाफी दिली

- आपल्या ज्या संस्था डबघाईला आल्या होत्या त्यांना कर्जमाफी दिली

- कर्जमाफी देताना कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून अपात्र लोकांना कर्जमाफी

- कर्ज दिलेले नसताना दिल्याचे दर्शवून कर्जमाफी करण्यात आली

- कोल्हापूर बँकेने दोन गुंठ्यांवर २० लाख रुपये कर्ज दिले

- कर्जमाफी करायची असेल तर ती खरचं पिचलेल्या शेतकऱ्यासाठी केली पाहिजे

 कर्जमाफी हा एकमेव उपाय नाही

- त्यामुळे जोपर्यंत त्या आधीच्या उपाययोजना करत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना फायदा होणार नाही

- शेतकऱ्याची अर्थव्यवस्था क्रेडीट बेस आहे, इनव्हेसटमेंट बेस नाही

- जोपर्यंत गुंतवणुकीच्या आधारावर ती अर्थव्यवस्था होणार नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही

- ज्यांच्या आत्महत्या झाल्या, त्यांना पाच वर्षात ना विहिर दिली ना पंप दिला

- मग कशाच्या आधारे आपण त्यांना या निराशेतून बाहेर काढणार

- माझ्यावर जी टीका झाली त्याने मी व्यतिथ झालो, पण निराश झालो नाही

- एका माऊलीला वाचूवू शकलो नाही याचे मला दुःख झाले

- यापुढेही मी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भेटणार

विरोधकांना सवाल

- सात वर्षात फक्त २० हजार हेक्टर सिंचन झाले

- शेतकऱ्याला पाणी, वीज देणार नाही मग त्याने जगायचे कसे हे तुम्ही सांगा मला

- विदर्भातील १९९४ चा सिंचन अनुशेष आजही कायम आहे

- १५ वर्ष तुम्ही सत्तेत होता काय केलेत

- शेतकऱ्याच्या शेतीला तुम्ही पाणी दिले नाही

- पंतप्रधान पॅकेजमधील विहिरीही तुम्ही पूर्ण करू शकला नाही

- १८ हजार विहीरी प्रलंबित होत्या, त्यातील ६ हजार विहिरी मी सहा महिन्यात पूर्ण केल्या

- २ लाख १५ हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे

- सिंचन प्रकल्पात कुठल्याही नियमांचे पालन न करता त्याची व्याप्ती आणि किंमती अशा वाढवल्या आहेत की अधिकारी मंजूरी द्यायला तयार नाही

- सिंचन प्रकल्पातील एक एक घोळ दूर करता करता नाकी नऊ येत आहेत

- वसंतराव नाईकांनी जलयुक्ती शिवार योजना सुरू केली

- पण तुम्ही काय केले एवढे वर्ष त्या योजनेचे

शाश्वत सिंचनासाठी

- आत्महत्याग्रस्त विदर्भ मराठवाड्यातील १४ जिल्ह्यात जलयुक्तची ६१९ कोटीचे कामे पूर्ण केली आहेत

- लोकसहभाग द्यायला तयार असणाऱ्या गावांचा समावेश या योजनेत करणार 

- पुढील तीन वर्षात ५० हजार शेततळी निर्माण करणार

- तीन वर्षात दीड लाख शेततळी निर्माण करणार

- शेततळ्याच्या माध्यमातून ५ लाख एक जमीन शाश्वत सिंचनाखाली आणणार

- तीन वर्षात १ लाख विहिरी तयार करणार

- त्यातून २.५ लाख एकर जमीन शाश्वत सिंचनाखाली

- वंचितांना पहिला प्राधान्य देणार

- जलसंधारणाचा अर्थसंकल्प ८०० रुपयांवरून वाढवून २२०० कोटी रुपये केला

- पैसे भरूनही १ लाख शेतकऱ्यांना वीज कनेक्शनपासून तुम्ही वंचित ठेवले 

- त्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे हे बघा़

- आम्ही आतापर्यंत ४७ हजार वीज जोडण्या दिल्या

- मार्च २०१६ पर्यंत एकही शेतकरी विना कनेक्शन राहणार नाही

आधारभूत किंमतीचा इतिहास

- डिसेंबर २०१३ मध्ये बाली येथील WTOच्या मिटींगमध्ये करार करून मार्च २०१६ पासून भारतात आम्ही कुठेही हमी भाव देणार नाही

- जुलै २०१४ साली मोदींचे सरकार आल्यानंतर जिनिव्हाला झालेल्या बैठकीत हा करार मंजूर नसल्याचे सांगितले आणि शेतकऱ्यांना हमी भाव देऊ असे सांगितले.

दूध आणि बारामती

- आम्ही केंद्राला शिफारस करणार आहोत आणि दुधाला हमीभाव देण्याची मागणी करणार आहोत

- शेतकऱ्याला १६-१७ रुपये आणि मुंबईत ५० रुपयाने दूध विकले जाते

- आम्ही आमच्या शासकीय डेअरी उद्धवस्त करून टाकल्या

- त्यामुळे मुंबईत आमचे दूध दिसत नाही आणि शेतकऱ्याला भाव मिळत नाही

- बारामती दूध संघ १७.५० रुपयात शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करते आणि डायनामिक्स डेअरीला २१.५० रुपयाला विकले जाते

- डायनामिक्स कंपनी हेच दूध मुंबईत ७० रुपये लिटरने विकते 

- तुम्ही काय देत नाही शेतकऱ्याला दोन रुपये जास्त 

- राजू शेट्टींची डेअरी २३.५० रुपयांचा भाव देते, तुम्हाला का परवडत नाही

टेक्सटाईल पार्क

- इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क तुम्ही कापूस उत्पादक जिल्ह्यात सुरू केले असते तर शेतकऱ्याला फायदा झाला असता

- आम्ही हे करणार आहोत, त्यासाठी ११२ नवे टेक्सटाईल पार्कचे प्रस्ताव आले आहेत

ऊस

- शेतकऱ्याला एफआरपीचे पैसे मिळावे यासाठी शासन कटीबद्ध आहे

- यासाठी ४०० कोटी दिलेत अजून देण्याची सरकारची तयारी आहे

अन्न सुरक्षा

- २२ लाख शेतकऱ्यांना अन्नसुरक्षेचा लाभ देणार

- २ रुपये तांदूळ आणि ३ रुपये किलो दराने गहू देणार

 कोकणासाठी प्रकल्प

- कोकणात जैन उद्योग समूह हापूस आंब्यावर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू करणार

- कोकण कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमान सुरू करणार प्रकल्प

- कोकणातील सर्व आंबा विकत घेणार

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण

- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या सर्व मुलांचा शिक्षणाचा खर्च सरकार उचलणार

- त्यांना चांगल्या शाळांमध्ये कसे शिक्षण देता येईल याची योजना तयार करतोय

- ज्या स्वयंसेवी संस्था त्यासाठी काम करतायत त्यांना बळकट केले जाईल

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.