'नव्या रिक्षा परमिटधारकांना मराठी सक्ती चुकीची'

नव्या ऑटो रिक्षा परमिटधारकांना मराठीची सक्ती करणं चुकीचं असल्याचं हायकोर्टाने आज म्हटलंय. 

Updated: Feb 27, 2017, 10:19 PM IST
'नव्या रिक्षा परमिटधारकांना मराठी सक्ती चुकीची' title=

मुंबई : नव्या ऑटो रिक्षा परमिटधारकांना मराठीची सक्ती करणं चुकीचं असल्याचं हायकोर्टाने आज म्हटलंय. राज्य सरकारने आरटीओला दिलेला आदेश चुकीचा असल्याचं हायकोर्टाने सुनावलंय.

राज्य सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. उद्या मुंबई हायकोर्ट या संदर्भात सविस्तर आदेश देणार आहे. मीरा भाईंदर ऑटो रिक्षा चालक संघटनेनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. बॅचधारकाला मराठीचं ज्ञान असावं, परवानाधारकांना कशासाठी असा सवाल हायकोर्टानं विचारण्यात आलाय.