राष्ट्रवादीचा काँग्रेसला इशारा, आम्ही वाट बघणार नाही!

मुंबई महापालिकेत आघाडीसाठी आम्ही काँग्रेसची वाट बघणार नाही. आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीने काँग्रेसला दिला आहे.

Updated: Nov 17, 2016, 07:36 PM IST
राष्ट्रवादीचा काँग्रेसला इशारा, आम्ही वाट बघणार नाही! title=

मुंबई : मुंबई महापालिकेत आघाडीसाठी आम्ही काँग्रेसची वाट बघणार नाही. आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीने काँग्रेसला दिला आहे.

आम्ही २२७ प्रभागात लढण्याची तयारी ठेवली आहे, आमची उमेदवार यादी तयार आहे. आघाडी नको ही मानसिकता काँग्रेसने पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही कायम ठेवावी, असे राष्ट्रवादीने काँग्रेसला स्पष्ट शब्दात सांगितले.