एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळातून काढून टाका - शिवसेना

शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान करणारे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

Updated: Nov 27, 2014, 06:50 PM IST
एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळातून काढून टाका - शिवसेना title=

मुंबई : शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान करणारे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

दुष्काळाच्या दुष्टचक्रात शेतकरी होरपळला आहे. एकट्या मराठवाड्यात २६० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून दुष्काळाच्या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना आधार द्या. त्यासाठी विशेष अधिकाराचा वापर करून केंद्राकडून तातडीची मदत मिळवून द्या, अशी मागणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली.

यावेळी विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार यावेळी उपस्थित होते. दुष्काळाच्या भीषण वास्तवाचा अहवालही राज्यपालांना देण्यात आला. मराठवाड्यात दुष्काळ स्थिती तर उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. चारापाण्याचा पत्ता नाही त्यामुळे जनावरे कत्तलीसाठी पाठविण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे, असे शिवसेनेकडून राज्यपालांच्या लक्षात आणून दिले.

या भीषण परिस्थितीशी सामना करणार्‍या शेतकर्‍यांच्या व्यथा सरकारने जाणून घेतलेल्या नाहीत. कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी मागणी सेनेने केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.