फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुराची तक्रार आता `ई-मेल`नेही

पुण्याच्या घटनेनंतर नको तो आक्षेपार्ह मजकूर आणि फोटोघातक आहेत.

Updated: Jun 10, 2014, 07:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोशल मीडियावर कुणीही आक्षेपार्ह मजकूर किंवा चित्र टाकल्यास त्याबाबतची तक्रार एसएमएस, फोन कॉल किंवा ईमेलद्वारेही पोलिसांकडे करता येणार आहे.
ही महत्त्वपूर्ण घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज `झी मीडिया`शी बोलताना केली.
विशेष म्हणजे अशा तक्रारदारांची नावे गुप्त ठेवण्यात येतील, असंही गृहमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं.
झी २४ तासवरील `सोशल मीडियाचा ताप` या विशेष कार्यक्रमात आर. आर. पाटील बोलत होते.
सोशल नेटवर्किंग अशांतता निर्माण करण्यासाठी नाही
पुण्याच्या घटनेनंतर नको तो आक्षेपार्ह मजकूर आणि फोटोघातक आहेत.
ज्यामुळे अशांतता पसरेल असा कोणताही मजकूर टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशा लोकांना तुरूंगात टाकल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असं आर.आर.पाटील यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियाचा वापर करून अशांतता पसरवणारे आरोपीही जेलमध्ये दिसतील, असंही आर आर पाटील यांनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.