फेसबूक पेजनं एटीएस-मुंबई पोलिसांची झोप उडवली!

सोशल साईटसवर बिझी असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी.... गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुकच्या एका पेजनं महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांची झोप उडवलीय. या फेसबुक पेजच्या माध्यमातून देशात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 20, 2013, 08:36 AM IST

www.24taas.com, अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई
सोशल साईटसवर बिझी असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी.... गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुकच्या एका पेजनं महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांची झोप उडवलीय. या फेसबुक पेजच्या माध्यमातून देशात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय.
ग्लोबलायझेशनच्या युगात हिंसा आणि द्वेष पसरवण्याचा मार्गही बदलतोय. आता दहशतवाद्यांनी हिंसा पसरवण्यासाठी सोशल नेटवर्किंगला हाताशी धरलंय. नुकतंच गुप्तचर विभाग आणि महाराष्ट्र ATS नं फेसबुकच्या माध्यमातून लोकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये द्वेष पसरवणा-या एका फ़ेसबुक पेजचा पर्दाफाश केलाय. तहरीक - ए - तालिबान हिंदुस्तान नावाच्या एका फ़ेसबुक पेजच्या माध्यमातून काश्मिर आणि खलिस्तानच्या मुद्द्यावरून हिंसक कमेंट केल्या जात होत्या.
विशेष म्हणजे या साईटसवर दाखवलेले व्हीडिओ एवढे धोकादायक आहेत की त्यामुळे देशात सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सायबर एक्सपर्ट संजीव गोयल यांनी सांगितले.
तहरीक - ए - तालिबान हिंदुस्तान हे पेज कुणी बनवलंय त्याचा ATS आणि गुप्तहेर खातं तपास करतंय. पण असे हिंसा पसरवणारे शेकडो वेब पेजेस आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई करणं एटीएस आणि गुप्तचर खात्याच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळेच यासाठी एक स्वतंत्र सायबर आयुक्तालय बनवण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.