माहिमच्या नया नगर झोपडपट्टीला आग

मायानगरी मुंबईत पुन्हा एकदा आगीचा भडका उडालाय.  माहिमच्या नया नगर झोपडपट्टीला आग लागलीय. 

Updated: Jan 4, 2016, 12:12 PM IST
माहिमच्या नया नगर झोपडपट्टीला आग  title=

मुंबई : मायानगरी मुंबईत पुन्हा एकदा आगीचा भडका उडालाय.  माहिमच्या नया नगर झोपडपट्टीला आग लागलीय. 

माहिमच्या रहेजा रुग्णालयाशेजारीच ही आग लागलीय. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी रवाना झालेत. 

आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न शर्थीने सुरु आहेत. दरम्यान, या अपघातात आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाल्याचे वृत्त नाहीये.

गेल्याच महिन्यात कांदिवलीच्या दामूनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. यात दोन हजार झोपड्या जळून खाक झाल्या होत्या.