पत्नीच्या कामेच्छेेच्या अतिरेकामुळं पतीला मिळाला घटस्फोट

तापट वृत्तीची पत्नी आणि तिच्या शारीरिक संबंधांच्या अतिरेकी इच्छेमुळं मुंबईतील कौटुंबिक न्यायालयानं एका तरुणाचा घटस्फोट मंजूर केला आहे. पत्नी कोर्टासमोर हजर न झाल्यानं कोर्टानं पतीचं म्हणणं ग्राह्य धरत या घटस्फोटाला मंजूरी दिली. 

Updated: Aug 31, 2014, 06:26 PM IST
पत्नीच्या कामेच्छेेच्या अतिरेकामुळं पतीला मिळाला घटस्फोट title=

मुंबई: तापट वृत्तीची पत्नी आणि तिच्या शारीरिक संबंधांच्या अतिरेकी इच्छेमुळं मुंबईतील कौटुंबिक न्यायालयानं एका तरुणाचा घटस्फोट मंजूर केला आहे. पत्नी कोर्टासमोर हजर न झाल्यानं कोर्टानं पतीचं म्हणणं ग्राह्य धरत या घटस्फोटाला मंजूरी दिली. 

पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणानं जानेवारीमध्ये मुंबईतील कौंटुबिक न्यायालयाकडे घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पत्नी तापट आणि भांडखोर असून ती हट्टी आणि मनमानी करते. तिच्या लैंगिक इच्छा जास्त आणि कधी तृप्त न होणाऱ्या आहेत असं या तरुणानं याचिकेत म्हटलं होतं. तिच्या या क्रूर वागणुकीमुळं आयूष्य भयावह केलं आणि आमचं एकत्र राहणं कठीण झाल्यानं घटस्फोट द्यावा, असं त्यानं याचिकेत म्हटलं होतं. 

सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याची पत्नी एकदाही कोर्टासमोर हजर झाली नाही किंवा त्यांनी कोर्टासमोर बाजूही मांडली नाही. अखेरीस कोर्टानं तरुणाचं म्हणणं ग्राह्य धरत घटस्फोटाला परवानगी दिली. 

काय आहे प्रकरण

मुंबईतील एका तरुणाचा २०१२मध्ये लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या काही दिवसांनीच पत्नीच्या भांडखोर स्वभावाचा त्याला अनुभव यायला लागला. पत्नी जबरदस्तीनं दारु पाजायची तसंच अनैसर्गिक संबंध ठेवण्यास दबाव टाकायची, असे संबंध ठेवण्यास नकार दिल्यावर पत्नी शिवीगाळ करायची असा गंभीर आरोप त्यानं केला होता. पोटदुखीच्या आजारादरम्यान डॉक्टरांनी लैंगिक संबंध ठेऊ नका असा सल्ला दिला होता. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करुन पत्नीनं जबरदस्तीनं लैंगिक संबंध ठेवले आणि त्यामुळं प्रकृती आणखी खालावली असा दावाही त्या तरुणानं केला होता. लैंगिक इच्छा पूर्ण न केल्यास दुसऱ्या पुरुषाकडे जाईन अशी धमकीही पत्नीनं दिली होती, असं या तरुणानं म्हटलं होतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.