आयआयटीच्या कँपस प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांची लाखोंची भरारी

आयआयटी मुंबईतून कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतलेल्या अभिनव गुप्ताला मायक्रोसॉफ्टनं किती रूपयांची नोकरी ऑफर केलीय, माहित आहे..? तब्बल 70 लाख रूपयांची... लाखो रुपये मिळकतीची नोकरी पदरात पाडून घेणारा तो एकटाच नाही... त्याच्यासारखे अनेकजण आहेत...थ्री इडियट्समधल्या फरहानसारखीच आयआयटी मुंबईतल्या अनेकांची अवस्था झालीय... कारण आयआयटीतून शिकलेल्या भोपाळच्या अभिनव गुप्ताला मायक्रोसॉफ्ट कंपनीनं चक्क 70 लाख रूपयांचं पॅकेज दिलंय...

Updated: Dec 4, 2015, 08:38 AM IST
आयआयटीच्या कँपस प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांची लाखोंची भरारी title=

दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई : आयआयटी मुंबईतून कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतलेल्या अभिनव गुप्ताला मायक्रोसॉफ्टनं किती रूपयांची नोकरी ऑफर केलीय, माहित आहे..? तब्बल 70 लाख रूपयांची... लाखो रुपये मिळकतीची नोकरी पदरात पाडून घेणारा तो एकटाच नाही... त्याच्यासारखे अनेकजण आहेत...थ्री इडियट्समधल्या फरहानसारखीच आयआयटी मुंबईतल्या अनेकांची अवस्था झालीय... कारण आयआयटीतून शिकलेल्या भोपाळच्या अभिनव गुप्ताला मायक्रोसॉफ्ट कंपनीनं चक्क 70 लाख रूपयांचं पॅकेज दिलंय...

आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये सध्या कॅम्पस प्लेसमेंटला सुरूवात झालीय. यंदाच्या प्लेसमेंटमध्ये तब्बल ४५० कंपन्यांनी सहभाग घेतलाय. आयआयटी पवईच्या याच कॅम्पसमध्ये सध्या आयआयटीअन्स कोट्यवधीची उड्डाणं घ्यायला तयार आहेत. गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि विविध स्टार्ट अप्स कंपन्यासमोर विद्यार्थ्यांची कसोटी लागणारेय. हवा तसा जॉब, हवी ती कंपनी आणि भरघोस पगार मिळवण्याचं आव्हान आयआयटी विद्यार्थ्यांसमोर आहे. 

इंटेल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, ओरॅकल, फेसबुक, याहू, फ्लिपकार्ट, टाटा स्टील, सॅमसंग अशा अनेक कंपन्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतायत. गेल्यावर्षीच्या तुलनेत अनेक विद्यार्थ्यांना या कंपन्यांनी लाखोंची पॅकेजेस ऑफर केलीयत.आयआयटीमध्ये दिवस-रात्र अभ्यास केल्यानंतर या विद्यार्थ्यांसाठी ही प्लेसमेंट म्हणजे हक्काची संधी असते. त्यामुळंच मुलाखतीसाठी फोन आल्यावर विद्यार्थ्यांच्या मनात धडकी भरतेच.. लाखोंची पॅकेजेस मिळवणा-या या विद्यार्थ्यांनाही आधी ऑल इज वेलचा मंत्र जपावा लागतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.