शिवसेनेची निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मोर्चेबांधणी सुरू

शिवसेना-भाजप युतीचा तिढा अजून सुटला नसताना निवडणुकीच्या दृष्टीकोनातून शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आणखी एक अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवार नगरसेवक प्रविण शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Updated: Jan 16, 2017, 08:34 AM IST
शिवसेनेची निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मोर्चेबांधणी सुरू  title=

मुंबई : शिवसेना-भाजप युतीचा तिढा अजून सुटला नसताना निवडणुकीच्या दृष्टीकोनातून शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आणखी एक अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवार नगरसेवक प्रविण शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

पक्षासाठी चांगलं काम करावं असं सांगत प्रविण शिंदेवर जबाबदारी दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. शिवसेना पक्षात आपली जबाबदारी चोख बजावणार असं सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडेन असं प्रविण शिंदे यांनी म्हटलं आहे,