मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने अती गोळ्या सेवन केले नसल्याचे फॉरेन्सिक लॅबच्या तपासणीनंतर पुढे आले आहे. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, इंद्राणीला हॉस्पीटलमध्ये जाऊन भेटण्याची वकिलांची मागणी विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
फॉरेन्सिक लॅबमध्ये केलेल्या तपासानुसार इंद्राणीच्या शरीरात कुठलंही केमिकल सापडलेले नाही. त्यामुळे अती गोळ्या घेतल्याने ती बेशुद्ध पडल्याचा प्रश्नच निकाली निघाला आहे. शुक्रवारी दुपारी गोळ्यांचा ओव्हर डोस झाल्यानं इंद्राणी बेशुद्ध पडल्याचा दावा जेल प्रशासनाकडून करण्यात आला होता.
दरम्यान, इंद्राणीची प्रकृती स्थिर असून चिंताजनक आहे, अशी माहिती जे जे रूग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांनी दिली आहे. पुढचे ४८ तास इंद्राणी डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणार आहे. काल दुपारी २ वाजल्यापासून इंद्राणीवर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.