काळबा देवी आग | सुनील नेसरीकर शहीद

काळबा देवी आगीतील अग्निशमन दलाचे जखमी जवान चीफ फायर ऑफिसर सुनील नेसरीकर शहीद झाले आहेत. सुनील नेसरीकर ही आग विझवतांना ४० टक्के जखमी झाले होते. ऐरोलीच्या बर्न हॉस्पिटलमध्ये सुनील नेसरीकर यांच्यावर उपचार सुरू होते.

Updated: May 24, 2015, 05:18 PM IST
काळबा देवी आग | सुनील नेसरीकर शहीद title=

मुंबई : काळबा देवी आगीतील अग्निशमन दलाचे जखमी जवान चीफ फायर ऑफिसर सुनील नेसरीकर शहीद झाले आहेत. सुनील नेसरीकर ही आग विझवतांना ४० टक्के जखमी झाले होते. ऐरोलीच्या बर्न हॉस्पिटलमध्ये सुनील नेसरीकर यांच्यावर उपचार सुरू होते.

यापूर्वी गुरूवारी काळबा देवी आगीतील गंभीर जखमी सुधीर अमीन हे शहीद झाले. सुधीर अमीन हे अग्निशमन दलात उपमुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून कार्यरत होते. 

काळबादेवीच्या गोकुळधाम इमारतीला आग लागली होती, तेव्हा कोसळलेल्या बिल्डिंगच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या एन. एम. देसाई आणि संजय राणे या दोन जवानांना उपचारांकरता जीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये दोघांनाही मृत घोषित केलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.