ब्रेन हॅमरेजमुळे कविता करकरे यांचा मृत्यू

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचं आज निधन झालंय. 

Updated: Sep 29, 2014, 03:35 PM IST
ब्रेन हॅमरेजमुळे कविता करकरे यांचा मृत्यू title=

मुंबई : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचं आज निधन झालंय. 

रविवारी, घरात पडल्यामुळे कविता करकरे यांना शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ब्रेन हॅमरेजमुळे त्या कोमात गेल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं.

कविता करकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा त्या पूर्णत: बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांच्या हृदयाचे कार्य नियमित व्हावं यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले... पण, त्या उपचारांना कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देत नव्हत्या. त्यांच्या काही तपासण्या केल्यानंतर त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निदान झालं. त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे त्यांच्या मेंदूचा रक्तपुरवठा खंडित झाला होता.

हेमंत करकरे...

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे २००८ साली झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. कामा हॉस्पीटलजवळ दहशतवाद्यांनी झाडलेल्या गोळ्या त्यांना चिरून गेल्या होत्या.

त्यांच्यासोबतच, या हल्ल्यात अॅडिशनल पोलीस कमिशनर अशोक कामटे आणि सीनिअर पोलीस इन्स्पेक्टर विजय साळसकर हेदेखील शहीद झाले होते. देशासाठी त्यांनी आपल्या प्राणाचं दिलेल्या योगदानाचा सन्मान करत सरकारनं त्यांना अशोक चक्र पुरस्कार प्रदान केला होता. हेमंत करकरे हे १९८२ बॅचचे आयपीएस अधिकारी होते.   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.