नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात

शक्तीचं प्रतीक मानलं जाणा-या देवीचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. राज्यात तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहुरची रेणुका, हे तीन पूर्ण पीठं तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्ध शक्तीपीठ मानलं जातं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 5, 2013, 07:15 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शक्तीचं प्रतीक मानलं जाणा-या देवीचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. राज्यात तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहुरची रेणुका, हे तीन पूर्ण पीठं तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्ध शक्तीपीठ मानलं जातं.

नवरात्रीच्या निमित्तानं आज घरोघरी घटस्थापना करण्यात येईल. स्त्रीला अन्यायाविरोधात लढण्याची शक्ती मिळावी म्हणूनही नऊ रात्री देवीचा जागर करण्यात येईल. दरम्यान, नवरात्र उत्सवात राजकीय होर्डींग लावण्यास बंदी घालण्यात आलीय. मुंबई महापालिकेनं असा आदेश काढलाय.
मुंबई हायकोर्टानं उत्सवादरम्यान राजकीय होर्डिंगबाजीबाबत मनपाला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसंच कारवाईला टाळाटाळ करणा-या पालिकेला कडक शब्दांत फटकारले होते. त्यापार्श्वभूमीवर आता मनपानं कठोर पावलं उचलली आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.