ट्रॅकवरून लोकलचा डब्बा घसरल्यानं हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प

हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक ऐन संध्याकाळच्यावेळी ठप्प झाली. संध्याकाळी ८.५५ मिनीटांनी वांद्रे-सीएसटी अप हार्बर लोकलचा दुसरा डबा रूळावरून घसरल्यानं ही वाहतूक ठप्प आहे.

Updated: Sep 14, 2015, 11:14 PM IST
ट्रॅकवरून लोकलचा डब्बा घसरल्यानं हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प title=

मुंबई: हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक ऐन संध्याकाळच्यावेळी ठप्प झाली. संध्याकाळी ८.५५ मिनीटांनी वांद्रे-सीएसटी अप हार्बर लोकलचा दुसरा डबा रूळावरून घसरल्यानं ही वाहतूक ठप्प आहे.

वांद्रे-सीएसटी हार्बर लोकलचा दुसरा डब्बा सीएसटी-मस्जिद  दरम्यान सीएसटी स्टेशनजवळ घसरला आहे. त्यामुळे १, २, आणि ३ ट्रॅकवरुन जाणरी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. सुदैवानं या अपघातात जीवितवानी झाली नाही. 

दरम्यान, वडाळा ते पनवेल यादरम्यानच वाहतूक सुरु राहिल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. तसंच हार्बरच्या प्रवाशांना सेंट्रलनं जाण्याची मुभा देण्यात आलेली आहे. पण ऐन गर्दीच्यावेळी हा अपघात झाल्यानं लोकांचे मात्र हाल होत आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.