मॅगी विरोधात सरकार २ मिनिटंही बोलणार नाही?

राज्य सरकार मॅगीविरोधात सुप्रीम कोर्टात अपील करणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. याबाबत सरकारनं गुंतवणुकीचं कारण पुढं केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 

Updated: Nov 17, 2015, 07:30 PM IST
मॅगी विरोधात सरकार २ मिनिटंही बोलणार नाही? title=

मुंबई : राज्य सरकार मॅगीविरोधात सुप्रीम कोर्टात अपील करणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. याबाबत सरकारनं गुंतवणुकीचं कारण पुढं केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 

नेस्ले कंपनीची महाराष्ट्रात मोठी गुंवणूक आहे. तसंच इतर राज्यांनी मॅगीविरोधात कोर्टात अपील केलेलं नाही. त्यामुळं नेस्ले इतर राज्यात गुंतवणूक करण्याची भीती राज्य सरकारला असल्यामुळं राज्य सरकारनं मॅगीबाबत कचराईची भूमिका घेतल्याचं बोललं जातंय. 

मॅगीच्या नमुन्यांमध्ये काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचं कारण सरकारनं याबाबत पुढं केलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.