निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचं 'फेरीवाला धोरण'!

मुंबई महापालिका निवडणुका येऊ घातल्यात. याच निवडणुकीवर डोळा ठेवत मुंबई महानगरपालिकेत फेरीवाला धोरण मांडलं जातंय. 

Updated: Jan 3, 2017, 11:12 AM IST
निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचं 'फेरीवाला धोरण'! title=

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका येऊ घातल्यात. याच निवडणुकीवर डोळा ठेवत मुंबई महानगरपालिकेत फेरीवाला धोरण मांडलं जातंय. 

मुंबईत सुमारे अडीच लाख फेरीवाले आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या ही उत्तर भारतीयांची आहे. त्यामुळे याच मतांवर डोळा ठेऊन राज्य सरकार आता फेरीवाला धोरण आणतंय आणि याबाबतचा प्रस्ताव आज कॅबिनेटसमोर मांडला जाणार आहे.

तर काय काय तरतुदी आहेत या धोरणामध्ये पाहुयात...

- टाईम शेअरिंग बेसवर एकच जागा थोडा-थोडा वेळ विविध फेरीवाले वापरू शकणार

- दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन पालिकेला अहवाल देण्यात येणार

- शेतकऱ्यांचा माल थेट शहरात विकणाऱ्यांना प्रोत्साहन देणार, यासाठी तात्पुरता परवानाही देण्यात येणार

- फेरीवाल्यांना स्कील ट्रेनिंग देणार

- नियम तोडल्यास दंड किंवा परवाना रद्द करणार