राज्याचे अधिवेशन, चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

राज्य विधीमंडळाचं उद्यापासून अधिवेशन सुरु होतोय. दरम्यान त्यानिमित्त ठेवण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. हे जनतेनं नाकारलेलं सरकार असल्याची टीका यावेळी विरोधकांनी केलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 1, 2014, 08:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्य विधिमंडळाचं उद्यापासून अधिवेशन सुरु होतोय. दरम्यान त्यानिमित्त ठेवण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. हे जनतेनं नाकारलेलं सरकार असल्याची टीका यावेळी विरोधकांनी केलीय.
सत्ताधारी आघाडी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी कंबर कसलीये. दलितांवर सर्वणांकडून होणारे अत्याचार, सहकारी बँकांची डबाघाईला आलेली स्थिती, राज्य सहकारी शिखर बँकातला घोटाळा यावरुन विरोधक सत्ताधा-यांना विशेषत: उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना धारेवर धरतील असं चित्र आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते विरोधकांना कसे उत्तर देतात याची उत्सुकता आहे.
विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागलीये.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.