`महायुती`च्या पाच पांडवांत शकुनीमामा?

पाच पांडव म्हणून एकत्र आलेल्या महायुतीमध्ये सध्या फूट पडण्याची दाट शक्यता निर्माण झालीय... याला कारण आहे ते माढा लोकसभा मतदारसंघाचं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 15, 2014, 06:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पाच पांडव म्हणून एकत्र आलेल्या महायुतीमध्ये सध्या फूट पडण्याची दाट शक्यता निर्माण झालीय... याला कारण आहे ते माढा लोकसभा मतदारसंघाचं...
माढा मतदारसंघावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपाइंनं एकाच वेळी दावा केलाय. माढा मतदारसंघ आपल्याला मिळाला नाही तर महायुतीमध्ये राहण्यात आपल्याला स्वारस्य नाही, असं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलंय. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हेदेखील याच जागेवरून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिलीय.
आज महायुतीची सभा होतेय. या सभेसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते सुभाष देसाई, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. पण, सगळ्यांचं लक्ष्य लागलंय ते महायुतीच्या सभेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, जानकर उपस्थित राहणार का? याकडे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.