वडाळ्यात बीपीटी परिसरात ऑईल पाईपलाईनला आग

 मुंबईतील वडाळा परिसरात भीषण आग लागलीय. ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.

Updated: Jun 13, 2015, 10:38 PM IST
वडाळ्यात बीपीटी परिसरात ऑईल पाईपलाईनला आग title=

मुंबई : मुंबईतील वडाळा परिसरात भीषण आग लागलीय. ही आग विझवण्याचे प्रयत्न रात्री उशीरापर्यंत सुरू आहेत.

मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात एका ऑईलच्या पाईपलाईनला आग लागलीय. अग्निशमन दलाच्या १५ गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करतायत.

खबरदारी म्हणून बीपीटी रोड वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आला होता. आता हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला गेलाय.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न करतायेत. आग आटोक्यात येत असली तरी अधूनमधून स्फोट होताना दिसत आहेत.

सकाळपासून पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम सुरु होतं. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. सुदैवानं कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.