बाप्पा गावी जाणार, नंतर आचारसंहिता येणार

गणेशोत्सवानंतर राज्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मंगळवारी याबाबतची घोषणा होऊ शकते. तर मतदान ९ ते १५ ऑक्टोबर दरम्यान दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. 

Updated: Sep 8, 2014, 06:39 AM IST
बाप्पा गावी जाणार, नंतर आचारसंहिता येणार title=

मुंबई : गणेशोत्सवानंतर राज्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मंगळवारी याबाबतची घोषणा होऊ शकते. तर मतदान ९ ते १५ ऑक्टोबर दरम्यान दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. 

गणेशोत्सवानंतर राज्यात निवडणुकांची घोषणा व्हावी अशी मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे केली होती. 

तर राज्यात गणेशोत्सवा दरम्यान बंदोबस्ताचा प्रचंड ताण पोलिसांवर असतो, त्यामुळे निवडणुकांची घोषणा उत्सवानंतरच व्हावी अशी विनंती पोलिसांनी निवडणूक आयोगाला केली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.