आघाडीचाही जागावाटपाचा तिढा सुटता-सुटेना

सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपाचा घोळ कायमच आहे. राष्ट्रवादी अजूनही 144 जागांवर ठाम आहे. मात्र आघाडीबाबत येत्या मंगळवारी शरद पवारच निर्णय घेतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. 

Updated: Sep 7, 2014, 10:48 PM IST
आघाडीचाही जागावाटपाचा तिढा सुटता-सुटेना title=

मुंबई : सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपाचा घोळ कायमच आहे. राष्ट्रवादी अजूनही 144 जागांवर ठाम आहे. मात्र आघाडीबाबत येत्या मंगळवारी शरद पवारच निर्णय घेतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. 

तर राष्ट्रवादीला 144 जागा देणार नाही, या भूमिकेवर प्रदेश काँग्रेस ठाम आहे, असा पुनरूच्चार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय.

उर्जा संकट आणि केंद्र सरकार
महाराष्ट्र राज्यावर असलेल्या उर्जा संकटाबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवत, राज्याच्या उर्जा संकटाबाबत केंद्र सरकार लक्ष देत नसल्याचं त्यांनी म्हटलय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.