म्हाडाचं घरं हवयं ना, तर आता जास्त पैसे भरा

मुंबईत आपलं स्वत:च घर असावं अशी सामान्य माणासाची इच्छा असते. आणि त्यासाठीच म्हाडाने पुढाकार घेतला.

Updated: Oct 13, 2012, 01:12 PM IST

www.24taas.com,मुंबई
मुंबईत आपलं स्वत:च घर असावं अशी सामान्य माणासाची इच्छा असते. आणि त्यासाठीच म्हाडाने पुढाकार घेतला. आणि सामान्यांच्या बजेटमध्ये त्यांना मुंबईत घरं मिळतील अशी घरे बांधली मात्र आता म्हाडा सर्वसामान्यांच्याच स्वप्नांना छेद देत आहे. राज्याच्या गृहनिर्माण विभागाने एप्रिलमध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून करण्याचा फतवा वित्त नियंत्रण प्राधिकरणाने काढला आहे.
या फतव्यानुसार म्हाडाची घरे घेणार्‍यांकडून १२.३६ टक्के सेवाकर आकारला जाईल. यामुळे म्हाडाच्या घरांच्या किमती वाढणार आहेत. म्हाडाची घरे घेणार्‍या ग्राहकांकडून १ एप्रिलपासून ३.९ टक्के दराने विक्रीकर आकारण्याचेही आदेश काढण्यात आले आहेत. तसेच ही घरे बांधणार्‍या विकासकांकडून ५ टक्के दराने तर घर घेणार्‍यांकडून सदनिकेच्या किमतीवर ४ टक्के दराने टीडीएस वसूल करण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत.
या निर्णयामुळे सदनिकांच्या किमतीत सरासरी १६ टक्क्यांनी वाढ होणार आहे. वाढीव किमतीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाच बसणार आहे.