राम कदम यांची मनसेला सोडचिठ्ठी, भाजपात प्रवेश

विधानसभा निवडणुका तोडांवर आलेल्या असतानाच मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.

Updated: Sep 18, 2014, 03:49 PM IST
राम कदम यांची मनसेला सोडचिठ्ठी, भाजपात प्रवेश title=

मुंबई: विधानसभा निवडणुका तोडांवर आलेल्या असतानाच मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.

घाटकोपर पश्चिमचे आमदार असलेले राम कदम आज संध्याकाळी पुण्यात भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून राम कदम हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.