मुंबईत १० जूनला मान्सूनची धडक?

भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, शनिवारी अंदमानात दाखल झालेला मान्सून ७ जून रोजी तळकोकणात, तर १० जूनला मुंबईत धडक देणार आहे.

Updated: May 17, 2015, 02:46 PM IST
मुंबईत १० जूनला  मान्सूनची धडक? title=

मुंबई : भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, शनिवारी अंदमानात दाखल झालेला मान्सून ७ जून रोजी तळकोकणात, तर १० जूनला मुंबईत धडक देणार आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत सांगितले की, मान्सून तळकोकणात दाखल होण्याची सरासरी तारीख ७ जून आहे; तर मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख १० जून आहे. 

जेव्हा सरासरी तारीख दर्शविली जाते तेव्हा मान्सून त्याच काळात दाखल होईल, असे म्हणता येत नाही. जोपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होत नाही म्हणजे जोवर त्याचा भूमीवरील प्रवास सुरू होत नाही, तोवर मान्सूनच्या पुढील प्रवासाचा तंतोतंत अंदाज वर्तविता येत नाही.

आता तो समुद्रावर म्हणजे अंदमानात असून, जेव्हा तो केरळमध्ये दाखल होईल आणि त्याचा उत्तरेकडील प्रवास सुरू होईल; तेव्हा त्याची मुंबईत दाखल होण्याची निश्चित तारीख सांगता येईल. 

अगदी भूतकाळ पाहिला तर यापूर्वी मे महिन्याच्या शेवटीही मान्सून मुंबईत दाखल झाला आहे; आणि अगदी एक महिना उशिरानेही मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. म्हणून आता दर्शविण्यात आलेल्या तारखा या सरासरी आहेत. 

च्नैर्ऋत्य मोसमी पावसाचे संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे तसेच दक्षिणपूर्व बंगालचा उपसागर, उत्तर अंदमान समुद्र, अंदमान बेटांच्या काही भागांत शनिवारी आगमन झाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.