मोटरमनचा 'डायबेटिज' ठरला चर्चगेट रेल्वे अपघाताला कारणीभूत?

चर्चगेट इथं २८ जूनला लोकल डेड एंन्डला धडकल्यानं झालेल्या दुर्घटनेला मोटरमनचा 'डायबिटीज' हा आजार कारणीभूत असल्याचं आता समोर येतंय.

Updated: Jul 14, 2015, 10:16 AM IST
मोटरमनचा 'डायबेटिज' ठरला चर्चगेट रेल्वे अपघाताला कारणीभूत? title=

मुंबई : चर्चगेट इथं २८ जूनला लोकल डेड एंन्डला धडकल्यानं झालेल्या दुर्घटनेला मोटरमनचा 'डायबिटीज' हा आजार कारणीभूत असल्याचं आता समोर येतंय.

दुर्घटनाग्रस्त मोटरमनच्या वैद्यकीय चाचणीतून ही माहिती समोर आलीय. मोटरमन हा 'हायपोग्लिशिमिया' नावाच्या आजारानं त्रस्त होता. या आजारात रक्तातील शुगरचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळं मानवाच्या संवेदना हरवतात. 

परिणामी, मोटरमनचा लोकलवरील नियंत्रण सुटलं आणि ही दुर्घटना घडल्याचं वैद्यकीय चाचणीतून समोर आल्याची माहिती 'झी मीडिया'चं दैनिक डीएनएनं दिलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.