वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची हत्या करून पोलिसाची आत्महत्या

मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यामध्ये काल रात्री धक्कादायक घटना घडली. वरिष्ठाशी झालेल्या वादातून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिर्के यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

Updated: May 3, 2015, 04:46 PM IST
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची हत्या करून पोलिसाची आत्महत्या title=

मुंबई: मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यामध्ये काल रात्री धक्कादायक घटना घडली. वरिष्ठाशी झालेल्या वादातून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिर्के यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

तत्पूर्वी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी आणि वायरलेस ऑपरेटर यांच्यावर गोळीबार केला. मात्र, जोशी यांच्या पाठीत शिरलेली गोळी यकृताला छेदत पोटातून बाहेर पडली. त्यामुळं रात्री उशिरा विलास जोशी यांचं निधन झाले. अहिरे यांच्या मांडीत गोळी घुसली आहे. या घटनेनं सुन्न झालेल्या वाकोला पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली. रात्री उशिरापर्यंत घटनेचा पंचनामा सुरू होता.  

विलास जोशी यांनी शिर्के यांना रजिस्टर नोंदीमध्ये, शुक्रवारी ड्यूटीवर गैरहजर दाखवल होतं. याच घटनेवरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यात शिर्के यांनी संतापाच्या भरात जोशी यांच्यावर गोळीबार केला, नंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. शिर्के यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून (९एमएम) तीन गोळया झाडल्या. हे रिव्हॉल्वर पुढील तपासासाठी हस्तगत करण्यात आलं आहे. या घटनेचा तपास क्राईम ब्रँचकडे दिला गेलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.