मुंबई महापालिकेसाठी भाजपची १२० उमेदवारांची यादी निश्चित

मुंबई भाजपाची वर्षावरील मॅरेथॉन बैठक संपली आहे. भाजपने मुंबई महापालिकेसाठी १२० उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 29, 2017, 08:31 PM IST
मुंबई महापालिकेसाठी भाजपची १२० उमेदवारांची यादी निश्चित title=

मुंबई : मुंबई भाजपाची वर्षावरील मॅरेथॉन बैठक संपली आहे. भाजपने मुंबई महापालिकेसाठी १२० उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. यानंतर पुढील २ दिवसांत उर्वरीत नावं निश्चित करण्यात येणार आहेत. उद्या अंतिम यादी निश्चित करण्यात येणार आहे. 

३ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असल्याने, उमेदवारांचा गोंधळ उडू नये म्हणून लवकरच पक्षाकडून अंतिम यादी निश्चित करण्यात येणार आहे.

मात्र मित्र पक्षांना मुंबई भाजप किती जागा सोडणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे शिवसेना सोडून गेल्यानंतर भाजप मित्र पक्षांना किती जागा देणार आहे हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही.