सत्ताधाऱ्यांचे दाभोलकरांच्या खून्यांना संरक्षण : राणे

दोन वर्ष झाली तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी मिळत नाही. कारण सत्ताधारी दाभोळकरांच्या खून्यांना संरक्षण देतेय, असा थेट आरोप काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी भाजप-सेना सरकारवर केलाय.

Updated: Aug 20, 2015, 07:49 PM IST
सत्ताधाऱ्यांचे दाभोलकरांच्या खून्यांना संरक्षण : राणे title=

मुंबई : दोन वर्ष झाली तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी मिळत नाही. कारण सत्ताधारी दाभोळकरांच्या खून्यांना संरक्षण देतेय, असा थेट आरोप काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी भाजप-सेना सरकारवर केलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असल्यामुळे गोविंद पानसरे आणि दाभोलकर यांचे खूनी पकडले जाणार नाहीत.  राज्यात कायदा व सुव्यस्था शिल्लक नाही, अशी टीका करीत तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपींच्या जवळ पोहोचलो होतो, असा दावा राणे यांनी यावेळी केला.

यावेळी राणे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देण्यावरुन श्रेय लाटणाऱ्यांना आणि त्यांना विरोध करणाऱ्यांना टोला लगावला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुरंदरे पुरस्कार वादावर पडदा टाकण्याचे बोलले. मात्र, मी सांगतो, पडदा टाकू नका तर पडदा उघडा.

राज्याचे सांस्कृतिक मंत्री खूप बोलायला लागले आहेत. मी त्यांना बोगस मंत्री म्हणतो. ते स्वत:ला मराठा आहे असे म्हणतात, तेव्हाही महाराजांना काही मराठ्यांनी विरोध केला होता. तुम्ही आधी मुंबई विद्यापीठात बोगस डिग्री वाटली जातेय तिकडे लक्ष द्या, बोगस मंत्र्यांनी जास्त बोलू नये, असा 'प्रहार' राणे यांनी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यावर केला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.