नवा खुलासा : हत्येच्यावेळी प्रेग्नेंट होती शीना बोरा, मुलाला जन्म देण्याचे सांगितले होते इंद्राणीला

 शीना बोरा हत्याकांड संपूर्णपणे नात्यांच्या गुंत्यात गुफटत आहे. या हत्याकांडा प्रत्येक तासाला एक नवनवीन धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे येत आहेत.

Updated: Aug 27, 2015, 08:02 PM IST
नवा खुलासा : हत्येच्यावेळी प्रेग्नेंट होती शीना बोरा, मुलाला जन्म देण्याचे सांगितले होते इंद्राणीला  title=

मुंबई :  शीना बोरा हत्याकांड संपूर्णपणे नात्यांच्या गुंत्यात गुफटत आहे. या हत्याकांडा प्रत्येक तासाला एक नवनवीन धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे येत आहेत. गुरूवारी या मर्डर केसमध्ये आणखी एक खुलासा झाला की हत्येच्यावेळी शीना बोरा गर्भवती (प्रेंग्नंट) होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शीना आपण गर्भवती असल्याची गोष्ट आपली आई इंद्राणीला सांगितले होते. तसेच त्या मुलाला जन्म देण्याचेही सांगितले होते. 

अधिक वाचा : सहआरोपी संजीव खन्नालाही नव्हती इंद्राणी-शीनाच्या खऱ्या नात्याची कल्पना

शीना ही इंद्राणीच्या एका जवळच्या मित्राकडून प्रेग्नंट होती, असा धक्कादायक बाब समोर येत आहे. शीना प्रेग्नंट असल्याची माहिती तीने दिल्याचे शीनाच्या मित्रांनी सांगितले होते. 

एका न्यूज चॅनलने दिलेल्या बातमीनुसार शीनाची हत्या करण्यापूर्वी तिला एक विषाचे इंजक्शन देण्यात आले होते. शीना हत्याकांड हे हॉरर किलिंगचे प्रकरण नसल्याचाही दावा या चॅनलने केला आहे. इंद्राणी मुखर्जीची संपत्ती हेच या हत्येचे कारण असल्याचेही म्हटले आहे. 

अधिक वाचा : 'संपत्तीसाठी शीनानं जोडले राहुलशी संबंध'

राहुल मुखर्जीसोबत आरामात राहता यावे, यासाठी शीना संपत्तीतून इंद्राणीकडे हिस्सा मागत होती. त्यामुळे इंद्राणीने शीनाला विषाचे इंजेक्शन देऊन हत्या केली. शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोन कारचा वापर करण्यात आल्याचे पोलिस तपास करीत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.