<B><font color=red>गुड न्यूज : </font></b>आता लर्निंग लायसन्सची मिळवा ऑनलाईन अपॉइन्मेंट

टोकन सिस्टिमला फाटा देणारा, दलालांची घुसखोरी बंद करणारा निर्णय अंधेरी ‘आरटीओ’नं घेतलाय. ३० डिसेंबरपासून लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाईन अपॉइन्मेंटची सुविधा आरटीओकडून सुरु करण्यात येणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 25, 2013, 08:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टोकन सिस्टिमला फाटा देणारा, दलालांची घुसखोरी बंद करणारा निर्णय अंधेरी ‘आरटीओ’नं घेतलाय. ३० डिसेंबरपासून लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाईन अपॉइन्मेंटची सुविधा आरटीओकडून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे साधं लायसन्स काढण्यासाठी सर्वसामान्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.
त्यामुळेच, लर्निंग लायसन्ससाठी टोकन मिळवण्यासाठी सकाळपासून लागलेल्या नागरिकांच्या रांगा आता दिसणार नाहीत. अंधेरी आरटीओचं नुतनीकरण आणि आधुनिकीकरण झाल्यामुळे लर्निंग लायसन्स आता अवघ्या ३० मिनिटांत मिळण्याची सुविधा उपलब्ध झालीय. मात्र, टोकनसाठी नागरीकांना मोठमोठ्या रांगा लावाव्या लागतात.
राज्य सरकारच्या वाहतूक विभागाच्या http://www.mahatranscom.in/ या वेबसाईटवर ऑन लाईन अर्जाची सुविधा आहे. यासाठी लिंकवर क्लिक करुन आवश्यक ती माहिती भरून लर्निंग लायसन्ससाठी आपल्याला सोयीची वेळ निवडता येणार आहे, अशी माहिती अंधेरी आरटीओचे उपप्रादेशिक अधिकारी भरत कळसकर यांनी दिलीय.
ही सुविधा ३० डिसेंबरपासून सुरु होत आहे. यावरुन धडा घेत राज्य सरकारच्या इतर विभागांनी अंधेरी आरटीओचा कित्ता गिरवला तर नागरिकांचा बराचसा त्रास कमी होईल यात शंका नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.