आघाडीनंतर आता महायुतीच्या जागावाटपाची तयारी

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 38 जागांची मागणी केलीय. राजू शेट्टी यांनी मागितलेल्या 38 जागांपैकी 8 जागा या राज्यातल्या वरिष्ठ मंत्र्यांविरोधात आहेत. तर 20 जागांवर शिवसेना भाजपचे उमेदवार आहेत. 

Updated: Aug 6, 2014, 06:45 PM IST
आघाडीनंतर आता महायुतीच्या जागावाटपाची तयारी title=

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 38 जागांची मागणी केलीय. राजू शेट्टी यांनी मागितलेल्या 38 जागांपैकी 8 जागा या राज्यातल्या वरिष्ठ मंत्र्यांविरोधात आहेत. तर 20 जागांवर शिवसेना भाजपचे उमेदवार आहेत. 

2009मध्ये त्या जागांवर चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर होतो. त्यामुळं केलेली मागणी अवास्तव नाही अशी भूमिका शेट्टी यांनी घेतलीय. महायुतीमध्ये आता स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम यांची वेगळी मोट बांधली जात असल्याचं चित्र आहे. जागावाटपासंदर्भात महायुतीतले हे घटकपक्ष एक वेगळी चर्चा करणार आहेत. 

यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 38 जागा, राष्ट्रीय समाज पक्षानं 30 तर शिवसंग्राम पक्षानं 15 जागांची मागणी केली आहे. अद्याप शिवसेना आणि भाजप यांच्यात जागावाटपाबाबत एकवाक्यता झालेली नाही. त्यामुळं दोघांच्या जागावाटपाअधीच घटक पक्षांनी जागेची मागणी केल्यानं महायुतीतील तिढा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान आम्ही या जागांची मागणी केली असली तरी यावर आम्ही अडून बसणार नसल्याचंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं. यासोबतच आमच्यातील समन्वयानंतर योग्य तो निर्णय घेऊन प्रमुख पक्षांपर्यंत तो पोहोचवू असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.