उत्तम डान्सर आणि सुंदर अक्षरं मोनिकाची होती ओळख...

घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात मोनिका मोरे या १६ वर्षीय मुलीनं आपले दोन्ही हात गमावल्यानं तिला मोठा मानसिक धक्का बसलाय. सध्या तिच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 14, 2014, 01:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात मोनिका मोरे या १६ वर्षीय मुलीनं आपले दोन्ही हात गमावल्यानं तिला मोठा मानसिक धक्का बसलाय. सध्या तिच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मोनिका मोरे ही कॉलेज विद्यार्थीनी उत्कृष्ट डान्सर होती. मात्र अपघातात तीचे दोन्ही हात गेल्यानं आता ती नाचू शकणार नाहीये. सुंदर अक्षर ही मोनिकाची कॉलेजमधील दुसरी ओळख.. मात्र आता हातच गमावल्यानं मोनिकाला मोठा मानसिक धक्का बसलाय.
कुर्ल्याच्या नेहरुनगर भागात राहणारी मोनिका शनिवारी दुपारी घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये लोकल पकडताना हात घसरून खाली पडली होती. दरम्यान मोनिकाच्या अपघाताला रेल्वे प्रशासनालाच जबाबदार धरत मोनिकाची जबाबदारी रेल्वेनंच घ्यावी अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी आणि कार्यकर्त्या मेधा सोमय्या यांनी केलीये.
दरम्यान काल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कांजूरमार्ग आणि घाटकोपर रेल्वे स्थानकावर मोर्चा काढत प्लॅटफॉर्मची पाहणी केली. यावेळी प्लॅटफॉर्मवरील अस्वच्छता, खड्डे, उंची आणि त्यामुळे घडणारे अपघात या सर्व गोष्टींची पाहणी किरीट सोमय्या यांनी केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.