रांगेच्या वादातून प्रवाशांमध्ये हाणामारी

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर शनिवारी रात्री प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाली. रांगेच्या वादातून प्रवाशांमध्ये ही हाणामारी झाली. मारामारी करणारे हे सर्व प्रवासी गोदान एक्स्प्रेसने जाणार होते. 

Updated: Apr 17, 2016, 11:48 AM IST
रांगेच्या वादातून प्रवाशांमध्ये हाणामारी title=

मुंबई : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर शनिवारी रात्री प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाली. रांगेच्या वादातून प्रवाशांमध्ये ही हाणामारी झाली. मारामारी करणारे हे सर्व प्रवासी गोदान एक्स्प्रेसने जाणार होते. 

जनरल डब्यासाठी हे प्रवासी रात्री नऊ वाजल्यापासूनच लाईन लावून उभे होते. यातील काही काही प्रवाशांमध्ये रांग लावण्यारुन शाब्दिक वाद झाला आणि त्याचं पर्यवसन पुढे हाणामारीत झालं. रेल्वे पोलिस उपस्थित नसल्यानं थोड्यच वेळात एलटीटीचं प्लॅटफॉम क्रमांक 3 जणू लढाईचं मैदानच बनलं. 

थोड्याच वेळानं रेल्वे पोलीस तिथं दाखल झाले आणि प्रकरण निवळलं. दरम्यान एका प्रवाशानं हा सारा प्रकार मोबाईलमध्ये शूट केला आणि त्याच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना अटक केलीये.